Breaking News

गव्हाण विद्यालयात लसीकरणाचा तिसरा टप्पा

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या येथील गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तिसरा टप्पा पार पडल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली.

विद्यालयातील पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लसीकरणापासून वंचित राहिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आकाश वावडेकर, डॉ. अमतुल्ला मर्चंट, आरोग्यसेविका भक्ती पालकर, आरोग्यसेवक जगदीश सुधाकर कदम तसेच डेटा ऑपरेटर हर्षल विष्णू पवार आदींनी विशेष सहकार्य लाभले.

विद्यालयातील उर्वरीत विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी लसीकरण विभागाचे प्रमुख विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक सुनील गावंड, योगिता पाटील, प्रा. माणिक घरत, प्रा. राजेंद्र चौधरी, सागर रंधवे, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर व सर्व वर्गशिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यालयात एकूण तिन्ही टप्प्यात आत्तापर्यंत माध्यमिक विभागाचे 85 टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख सुनील गावंड यांनी दिली.

या वेळी प्राचार्य साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य आणि रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply