कळंबोली : प्रतिनिधी
तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांच्या प्रयत्नातून टीएमएमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या देशात आवश्यकतेनुसार 40 टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे. भारतात केवळ 0.6 टक्के लोक रक्तदान करतात. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानूसार लक्षात आले आहे. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि रक्तदाबसारखे आजार होत नाही, असेही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रक्तदान शिबिराला कारखाना मालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने 131 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संक्रमण विभाग (रक्तपेढी) टाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर उपचार अनुसंधान आणि शिक्षाचे प्रगत या डॉक्टरांच्या टीमने शिबिरासाठी खूप मेहनत घेतली. रक्त तपासणी संदर्भात न्युट्रिक अॅसिड टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. मात्र, ती केवळ मुंबई आणि दिल्लीत आहे. भारतात 2 हजार 750 रक्तपेढ्या आहेत, तर महाराष्ट्रात 282 रक्तपेढ्या आहेत. या माध्यमातून रक्तपुरवठा रुग्णांना रक्तपुरवठा केला जात असला तरी अजून बरीच आवश्यकता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन तळोजा मॅन्युफ्चॅर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांनी या शिबिरामध्ये केले आहे.