नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. दहशतवादाला पोसणार्या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या देशांचा एकत्रितपणे विरोध व्हायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरूच्चार त्यांनी या वेळी केला. जागतिक कारभाराच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली आहेत. यामध्ये बदल होण्याची नितांत गरज असल्याचे भारताला वाटते. संयुक्त राष्ट्रासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनादेखील वर्तमानातील वास्तवानुसार काम करीत नाहीत. जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आरोग्य संघटनांमध्येही बदलांची गरज आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …