Breaking News

माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप

खोपोली : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ

वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्रीकांत पुरी, शाळा समिती स्थानिक अध्यक्ष राजू ढूमने, सुनिल नांदे  यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रम भाजप पदाधिकारी ईश्वर शिंपी व पुनीत तन्ना यांच्या नियोजनातून संपन्न झाला. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते या शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना नवीन कपडे, शालेय साहित्य व तिळगुळ देण्यात आले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply