Breaking News

टीबीची लक्षणे आणि उपचार

सलग दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असेल तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांना टीबी अर्थात क्षयरोग तरी झाला नाही ना…आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन आहे. एका अहवालानुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख 90 हजार क्षयरुग्णांची नोंद होते. केवळ खोकला नव्हे, तर अन्य काही अशी लक्षणे आहेत ज्यामुळे टीबी आहे की नाही हे जाणून घेता येईल. यात दोन आठवडे किंवा जास्त काळ खोकला येणे, कधी कधी रक्तही पडणे, संध्याकाळच्यावेळी हलकासा येणारा ताप, भूक मंदावणे, वजनात घट होणे, अशक्तपणा वाटणे, छातीमध्ये दुखणे, रात्री घाम येणे या गोष्टींचा समावेश आहे.

ताप : सर्वसाधारणपणे ताप अनेक कारणांमुळे येतो. शरीराचे तापमान कमी-जास्त होण्यामुळेदेखील ताप येऊ शकतो. पण जर तुम्हाला वारंवार असे वाटत असेल की ताप पुन्हा पुन्हा येतोय. विशेषत: संध्याकाळच्यावेळी हलकासा ताप जाणवत असेल तर एकदा टीबीची चाचणी करून घ्या.

भूक मंदावणे : अनेक वेळा थकवा, अति काम आणि तणाव यामुळे भूक मंदावते. वरील तीन कारणांशिवाय तुमचे जेवण कमी  झाले असेल, तर तातडीने डॉक्टरांना दाखवा.

वजनात घट होणे : योग्य आहार आणि चांगली लाईफस्टाईल जगणार्‍या व्यक्तीला टीबी होऊ शकतो. वजन अचानक कमी होत असेल, तर ते टीबीचे एक प्रमुख लक्षण असू शकते.

रात्री घाम येणे : अनेकांना रात्री अचानक घाम येतो. रात्री ताप आणि घाम येत असेल तर तो टीबीमुळे असू शकतो.

अशक्तपणा वाटणे : आजार मग तो कोणताही असो शरीर काही प्रमाणात तरी अशक्त होते. त्यामुळे अंग दुखणे, थकवा, आळस अशी लक्षणे आढळतात.

उपचार प्रक्रिया : संशयित क्षयरुग्णांचे दोन थुंकी नमुने (बेडका) तपासणी होणे महत्त्वाचे आहे. थुंकीत जंतू आढळल्यास नवीन रुग्णास त्याच्या वजन गटानुसार औषध सुरू केले जाते. दोन महिने संपल्यानंतर थुंकीची पुन्हा तपासणी केली जाते. चार महिने सातत्याने पुढील औषधोपचार घेतल्यास रुग्ण पूर्ण बरा होतो.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply