Breaking News

अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद

मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी व घंटानाद करण्यात आला.

या वेळी मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार, मुख्याधिकारी अमित पंडित यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी वृंदासह मोठ्या प्रमाणात घंटानाद करण्यात आला. असंख्य नागरिकांनीसुद्धा थाळीनाद  करून व शंख वाजवून कोरोनासाठी

काम करणार्‍या लोकांना प्रोत्साहन दिले. 

मुरूड नगर परिषदेतर्फे अग्निक्षमक गाडीचा सायरनसुद्धा वाजवण्यात आला. घंटानाद कार्यक्रमासाठी पोलिसांसह नगर परिषद, आरोग्य कर्मचारी व शहरातील नागरिकही सहभागी झाले होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply