Breaking News

संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई

पोलिसांनी केल्या नऊ दुचाकी जप्त

पनवेल : वार्ताहर

देशभरात कोरोना अर्थात कोविड 19 विषाणू थैमान घालत आहे. प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असला तरीही स्टेज तीनची परिस्थिती पाहता तो वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केली होते. याच आदेशाचे पालन करीत तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तळोजा परिसरात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या  मोटरसायकलस्वारांवर भा. दं. वि. कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत नऊ  मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून नऊ ते दहा मोटरसायकल स्वारांना ताब्यात घेतले होते. संपूर्ण तळोजा परिसरातील संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍या मोटरसायकल स्वारांवर धडक कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांचा जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू आहे. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply