Breaking News

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कळंबोलीतील वाहनचालकांना अन्नवाटप

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतातदेखील कोरोना विषाणू पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बहुतेकजण आहेेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशा अडकलेल्या वाहनचालकांना आनंद दिघे युुवा प्रतिष्ठानतर्फे पंचशील मधुकर शिरसाट व गरीब गरजूंना  पनवेल महानगरपालिकेच्या मागणीनुसार कळंबोली येथे अन्नवाटप केले जात आहे. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या वतीने केदार दिघे यांच्या मार्गदर्शनानुसार भुकेलेल्यांची भूक भागविणे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे. अशाचप्रकारे धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे पंचशील मधुकर शिरसाट व पनवेल महानगरपालिकेच्या मागणीनुसार कळंबोली येथे अडकलेल्या वाहनचालकांसह सर्वांना अन्नवाटप केले व पुढील काही दिवस अशीच सेवा सुरू राहील, असेे आनंद दिघे युुवा प्रतिष्ठानच्या वतीने सांंगण्यात आले आहे. कोणालाही आर्थिक किंवा सामानाची मदत करायची असल्यास त्यांनी प्रतिष्ठानचे पनवेल तालुकाध्यक्ष अर्जुन परदेशी 9664848484, तालुका सचिव सुजय म्हात्रे 8767170249, तालुका उपाध्यक्ष प्रदीप माखिजा 9323105260, शहर सचिव यतीन मानकामे 8692810005, शहर उपाध्यक्ष शिवाजी पवार. तसेच शहर कार्याध्यक्ष शैलेश जगनाडे 8286494949, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन जोशी 9768687198, सोशल मीडिया शहराध्यक्ष तोफिक बागवान 8898929702, शहर संघटक ओमकार शेटे 9920175363, शहर उपसचिव गणेश पंडित 8689845986 यांच्याशी संपर्क साधावा, अथवा गुगल पे व फोन पे (9322379153, 8767170249)द्वारे मदत देऊ शकतो, असे  प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply