Breaking News

खारघरमध्ये रिक्षाचालकाला कोरोना

पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 21

पनवेल : प्रतिनिधी
खारघर येथे बुधवारी (दि. 8) कोरोनाचा आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे  पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 झाली आहे.
खारघरमधील एका रिक्षाचालकाचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 17वर पोहचली आहे. यामध्ये कळंबोलीत 11 (सीआयएसएफ जवान), कामोठ्यात दोन, तर खारघरमध्ये चार रुग्ण आहेत. यापैकी कामोठे येथील दोन, खारघर येथील एक आणि कळंबोलीतील एक सीआयएसएफ जवान बरा झाला आहे, तर उलवे नोडमधील चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पनवेलमधून आतापर्यंत 283 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 21 नमुने पॉझिटिव्ह आले, तर 231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 31 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply