Breaking News

‘कोविड उपचाराकरिता सिडकोने पनवेल पालिकेला 100 कोटी द्यावेत’

नगरसेवक मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल उप जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी  आय. सी. यू. कक्ष उभारणे तसेच कोविड-19 साठी उपयुक्त असे रेमडिसीपीर  इंजक्शनचे 5 हजार डोस पुरविणे किंवा पनवेल महानगरपालिकेला कोविड-19च्या साथीवर उपचार करणे करिता 100 कोटी रुपयांचे  अर्थ सहाय्य देण्याची मागणी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या व्यस्थापकिय संचालकांकडे केली आहे.

पनवेल महानगरपालिका अद्याप बाल्याअवस्थेत असून तिचे आर्थिक उत्पन्न ही अत्यल्प आहे. सिडकोने विकसित केलेली  13 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वसाहत ही पनवेल महानगरपालिकेचा एक महत्त्वाचा भाग असून ग्रामीण भागातील  उलवे, करंजाडे या वसाहतीची लोकवस्ती पाहता कोरोना  अथवा भविष्यात वेगवेगळ्या साथीचे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचप्रमाणे सिडको नव्याने विकसित करत असलेला नैना प्रकल्पाचे काम ही लवकरच पूर्ण होणार आहे. सिडकोने ठाणा व रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या जमिनी घेऊन प्रथम सिडकोने प्रचंड प्रमाणात नफा मिळवलेला आहे व आता नैना प्रकल्प उभारू पाहत आहे या प्रकल्पामधून ही सिडको प्रचंड प्रमाणात नफा मिळणार आहे.

कोविड -19 ची लागण झाल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सिडकोने मुलुंड येथे कोविड-19 च्या रुग्णांसाठी तात्पुरत्या सुसज्ज हॉस्टेलची उभारणी केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल ग्रामीण क्षेत्रासाठी सध्या कार्यरत असलेले कोविड -19  हॉस्पिटल आमदार प्रशांत ठाकूर व तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले आहे व सध्या कोरोना रुग्णांसाठी भरोश्याचे असलेले हे एकमेव रुग्णालय असून, यामध्ये अत्याधुनिक आयसीयू सेंटर की ज्यामध्ये कमीत कमी 25  व्हेंटिलेटर तसेच कोरोना रुग्णांसाठी रेमडिसीवीर इंजेक्शनचे कमीत कमी पाच हजार डोस पुरवल्यास जनतेला हे इंजेक्शन सहजगत्या उपलब्ध होईल शक्य नसल्यास पनवेल महानगरपालिकेकडे या सोयी सुविधा सध्यासाठी व भविष्यासाठी निर्माण करण्याकरिता शंभर कोटीची रक्कम त्वरित वर्ग करावी. अन्यथा सिडकोला भविष्यात पनवेल तालुक्यात कोणता ही प्रकल्प राबविण्यास जनता विचार करावयास लावेल असा इशारा नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोच्या  व्यस्थापकिय संचालकांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply