Breaking News

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आद्य प्रचारक, पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रयत शिक्षण संस्थेच्या अ. पां. भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगावमध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य श्री. तारेकर यांनी प्रतिमेचे पूजन केले. तसेच विद्यालयाच्या प्राचार्य पी. आर. ठाकूर, उपमुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, पर्यवेक्षिका एस. एस. पाटील, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्ही. एल. म्हात्रे आणि विद्यालयातील सेवकांनी फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख के. एम. जितेकर आणि एम. एम. पाटील यांनी केले. बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींनी विश्वसुंदरीपासून ते सफाई कामगार अशा विविध क्षेत्रांत काम करणार्‍या स्त्रियांची वेशभूषा करून नारीशक्तीचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील यांनी केले, तर आभार के. एम. जितेकर यांनी मानले.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply