पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 3) कोरोनाच्या तब्बल 353 रुग्णांची नोंद झाली असून, चार जण मृत्युमुखी पडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 186, पनवेल ग्रामीणमधील 47, रोहा तालुक्यातील 33, अलिबाग तालुक्यातील 19, महाड तालुक्यातील 14, उरण व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी 13, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सात, पेण तालुक्यातील सहा, कर्जत तालुक्यातील चार, खालापूर तालुक्यातील तीन आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे, मृत व्यक्ती पनवेल, पेण, अलिबाग व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक अशा आहेत. दुसरीकडे दिवसभरात 81 रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4812वर पोहोचला असून, मृतांची संख्या 144 इतकी झाली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …