Breaking News

भाजप प्रवेशाचा अखंड ओघ, पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर, कामोठ्यातील शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पनवेल तालुक्यातील पाले खुर्द, खांदा कॉलनी, खारघर आणि कामोठे येथील शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन सर्वांचे भाजपत स्वागत केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष वासुदेव घरत, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, भाजप नेते रमेश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, सुधाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा उपाध्यक्षपदी बाळाराम दामणे यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी शेकापचे पाले खुर्द गावातील कट्टर समर्थक हनुमान खांडे, कानपोली ग्रामपंचायतीच्या सदस्य अलका खानावकर, खांदा कॉलनी येथील प्रकाश खानावकर, राखी पिंपळे, संदेश खानावकर, विश्वनाथ चिले, सागर शिंदे, संतोष मोटे, राजू मोटे यांच्यासह समर्थकांनी, तसेच कामोठे येथील महिला काँग्रेस शहर अध्यक्षा दीक्षा जगताप, आशा कांबळे, अपर्णा कांबळे, रूपाली मोरे, सुनीता बनसोडे, नीता ससाणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

विजयाचे साक्षीदार व्हा : देशमुख महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यंदा तिसर्‍यांदा निवडून येऊन हॅट्ट्रिक साधणार आहेत. त्यांना मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी या वेळी मनोगतातून केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply