पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन मंगळवारी (दि. 6) साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पटवर्धन हॉस्टिपलमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नगरसेविका दर्शन भोईर यांनी लाडू आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पन्हे वाटप केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, हॉस्पिटलचे सेक्रेटरी राजू समेळ, संदीप लोंढे, भाजप सांस्कृतीक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, भाजप युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, ओम करमरकर आदी उपस्थित होते.