Breaking News

कळंबोली भाजप युवा मोर्चाकडून स्वदेशी माल विक्रीसंदर्भात जागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात चीनी मालावर बहिष्कार टाकून, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी स्वदेशी मालाची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कौतुक करण्यात आले. तसेच त्यांना फक्त स्वदेशी मालाची विक्री करण्याविषयीचे जनजागृती करण्यात आली. या संदर्भात व्यापार्‍यांना भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांनी पत्रक दिले आहे.

पत्रकामध्ये म्हटल्याप्रमाणे, आपण होतकरू व्यापारी आहात व प्रचंड मेहनतीने आपला व्यवसाय करून देशाच्या आर्थिक जडणघडणीत मजबूत हातभार लावत आहात, आपल्या प्रती भारतीय जनता युवा मोचीला अभिमान वाटतो. कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर रायगड जिल्हयाच्या वतीने युवकांमध्ये मेड इन इंडिया वस्तू वापरण्यासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी व देश बलशाली व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अतोनात प्रयत्न करून संपूर्ण जगाला आपल्यासोबत आणून चीनला चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्याला माहित असेलच कि, अखिल भारतीय व्यापारी महासंघाने’ देखील चीनमध्ये तयार झालेल्या मालाची आयात मोठया प्रमाणात थांबवून देशहितासाठी चांगले पाऊल उचलले आहे.

आता जबाबदारी आपल्यावर देखील आहे आपण जे सुपरमार्ट चालवता त्यामध्ये मेड इन चायना वस्तू ठेवणे कटाक्षाने टाळा, ग्राहकांना स्वदेशी वस्तू कशा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतील याची आपण दक्षता घ्यावी जेणेकरून आपल्या देशातला पैसा आपल्याच देशात राहील. शक्यतो मेड इन इंडिया’ वस्तूंचे वेगळे व आकर्षक काऊंटर ठेवा तेथे तसा बोर्ड लावा. आपले हे कार्य भारतमातेच्या चरणी अर्पित होऊन हे सुपरमार्ट भविष्यात चांगली वाटचाल करेन अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, सदस्य जमीर शेख, युवा मोर्चा, कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष गोविंद झा, अझर शेख, मनीष अग्रहारी आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply