खोपोली : प्रतिनिधी
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरला दुधाच्या टँकरने दिलेल्या धडकेत टँकरचालकासह दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 18) दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर उभा असलेल्या ट्रेलर (आरजे 02-जेबी 2043)चे पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुधाच्या टँकर (एमएच 43-एडी 6029)ने ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकरचालक हाजी फुला (वय 43, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) व सहप्रवासी विजय निवृत्ती मरगज (वय 41, रा. विलेपार्ले, मुंबई) असे दोघे जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले.