नवी मुंबई : बातमीदार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. संजय मुखर्जी यांची सिडकोच्या उपाध्यक्ष व एमडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चंद्रा यांच्या बदलीचे आदेश काढले तसेच डॉ. मुखर्जी यांना तत्काळ रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिडकोची घरे, मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पाचा विस्तार, नवी मुंबई, पनवेल व उरण भागातील भूमिपुत्रांचे प्रश्न, विमानतळ बाधितांच्या समस्या सोडवण्याचे शिवधनुष्य डॉ. मुखर्जी यांना पेलावे लागणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …