Breaking News

माणगावात एसटी चालक, वाहकावर गुन्हा

 

माणगाव : प्रतिनिधी

कर्तव्यावर असताना सोमवारी (दि.29) सकाळी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने तसेच शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एसटी चालक व वाहकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटी बस (एमएच-13,सीयू-8185) चा  चालक  ज्ञानेश्वर अशोक कापडी (वय 31, सध्या रा. भिवंडी, मूळ रा. भोकर, जि. जळगाव) आणि वाहक खुशाल अशोक सूर्यवंशी (सध्या रा. भिवंडी, मूळ रा. खालप, जि. नाशिक) या दोघांनी सोमवारी कर्तव्यावर असताना अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. त्या दोघांना माणगाव आगार प्रमुख चेतन देवधर, वाहतूक निरीक्षक अजित पांडू अवतार व सहाय्यक वाहतूक निरीक्षक तुषार चंद्रकांत हाटे हे माणगाव पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना वाहक खुशाल सूर्यवंशी हा तिकिटांची रोख रक्कम 910 रुपये सोबत घेऊन पळून गेला.

या प्रकरणी सहाय्यक वाहतूक निरीक्षक तुषार हाटे  दिलेल्या फिर्यादीवरुन माणगाव पोलीस ठाण्यात एसटी चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पी. एस. पवार करीत आहेत.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply