Breaking News

पनवेल फाइट्स कोरोना ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेल फाइट्स कोरोना या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी कोरोनाला पराभूत करण्याची आयडिया, घरातच धमाल मस्ती, कोरोनानंतर जीवन, बेघर/गरिबांच्या कोरोना समस्या असे चार विषय असून, काढलेल्या चित्राचा फोटो response@PrashantThakur.in किंवा 9920765765 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. 

स्पर्धेसाठी वय 12 आणि आत, 13 ते 18, 19 ते 21 आणि 22 व पुढे असे चार गट असून, 40 विजेत्यांना (10 प्रति गट) प्रत्येकी एक हजार रुपये आणि ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी चित्र पाठवायची अंतिम मुदत 10 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन कोरोनावर मात करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply