Breaking News

राज्यात कोरोनाचा कहर

देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील

मुंबई : प्रतिनिधी
देशातील एकूण रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच देशात आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी एक महाराष्ट्रातील आहे. काळजी वाढवणारी गोष्ट देशात आतापर्यंत 66 हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील 25 हजारांच्या जवळपास रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात बुधवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 78 हजार 357 जण कोरोना रुग्ण आढळून आले, तर याच कालावधीत देशात एक हजार 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नव्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 37 लाख 69 हजार 524 इतकी झाली आहे. यात आठ लाख एक हजार 282 रुग्ण सध्या देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 29 लाख एक हजार 909 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 66 हजार 333 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशातील एकूण रुग्णांच्या आकडेवारी महाराष्ट्रातील एक चतुर्थांश रुग्ण आहेत. महाराष्ट्रात नवीन 15 हजार 765 रुग्ण आढळून आले आहेत, तर 320 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या आठ लाख आठ हजार 306 इतकी झाली असून, मृतांचा 24 हजार 903वर पोहोचला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
करोना चाचण्या सातत्याने नियंत्रित केल्या जात असल्याने दिवसेंदिवस स्थिती आणखी विदारक होत चालली आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. देशातील सात राज्ये 70 टक्के रुग्णांची भर घालत असून, यातील केवळ तीन राज्ये 43 टक्के भर घालत आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असल्याने मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत आहे. असे असतानाही मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर बोलताना नागपूर दौर्‍यावर आलेले फडणवीस यांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर असून, मीदेखील त्याची माहिती घेतली. तरुण पत्रकाराचा अशा पद्धतीने मृत्यू होणे अंतर्मुख करणारे आहे. याकडे तत्काळ लक्ष दिले पाहिजे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply