Breaking News

पनवेल तालुक्यात 308 नवे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; 211 बाधितांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 3) कोरोनाचे 308 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 211  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 248 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा  मृत्यू झाला आहे तर 184  रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 60 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर13 ए टाईप, सेक्टर 3 क्लासिक सृष्टी सोसायटी, खांदा कॉलनी सेक्टर 9  वृंदावन सोसायटी, पनवेल मानसरोवर अपार्टमेंट, कळंबोली सेक्टर 3 ई सुंदर सोसायटी आणि खारघर सेक्टर 36 विंग व्हॅली येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2141 झाली आहे. कामोठेमध्ये 53  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2648 झाली आहे. खारघरमध्ये 63 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2528 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 58 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2329 झाली आहे. पनवेलमध्ये 41 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 2215 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 614  झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 12475 रुग्ण झाले असून 10705   रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.81  टक्के आहे. 1469 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 301  जणांचा मृत्यू झाला आहे.

उरणमध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह 14 रुग्ण आढळले व 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये जासई दोन, करंजा, द्रोणागिरी रोड, म्हातवली, द्रोणागिरी नोड, नगरपालिकेच्या मागे उरण, करंजा रोड, दिघोडे, विंधणे, करंजा, धाकटी जुई, बोकडवीरा, धुतुम प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर भेंडखळ दोन, कोटनाका उरण, धुतुम, साईनगर गजानन निवास उरण येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1415  झाली आहे. त्यातील 1156 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 189   कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

नवी मुंबईत 335 जण बाधित

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी 335 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर 243 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी बेलापूर 71, नेरुळ 73,  वाशी 51, तुर्भे 42, कोपरखैरणे 32 घणसोली 23, ऐरोली 37, दिघा सहा, अशी आहे.

महाडमध्ये 13 रुग्णांची नोंद

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर दोघांनी कोरोनावर मात केली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये तांबटआळी चार, स्वामी स्विट शेजारी नविपेठ तीन, प्रभाकर कॉम्प्लेक्स, नातेखिंड, एमजी रोड नविपेठ, एमजी रोड, गोंडाळे, जुनी पेठ येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमध्ये 115 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत, तर 828 रुग्ण बरे झाले आहेत. अतापर्यंत महाड तालुक्यात 988 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जतमध्ये 24 जणांना लागण

कर्जत : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन 24 रुग्ण आढळले असून आतापर्यंत तालुक्यात 928 रुग्ण आढळले आहेत. 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 42 वर गेली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जतच्या मुख्य शहरात चार, शिंगढोळ तीन, नेरळ दोन, भिवपुरी, माले, गुढवण, वांजळे, लाडीवली, डोंगरपाडा, कशेळे, कोल्हारे, मिरचोळीवाडी, कळंब नजीकच्या सुतारपाडा, कळंब, पोशिर, गरपोली, वरई, गणेगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply