Breaking News

फुंडे गावात भाजपची जबरदस्त प्रचार रॅली

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, वेश्वी, फुंडे ह्या सहा ग्रामपंचायतींमधील निवडणूक असल्याने भाजपच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच भाजपचे महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्या हस्ते फुंडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. रविवारी (दि. 10) फुंडे गावात प्रचाराची भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी प्रकाश भोईर, उमेश घरत, संदीप म्हात्रे, नितीन म्हात्रे, बूथ अध्यक्ष राकेश घरत, हेमंत भोईर, अनिल म्हात्रे, विशाल म्हात्रे, राकेश म्हात्रे, जयराम म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, सदानंद म्हात्रे, मधुकर म्हात्रे, संजय नारायण म्हात्रे, संजय जानू म्हात्रे, गणेश म्हात्रे, सागर म्हात्रे, दत्ताराम म्हात्रे, वैशव म्हात्रे, जयेश म्हात्रे, किशोर म्हात्रे, जयेश भगत, हेमंत म्हात्रे, हेमलता म्हात्रे, कविता म्हात्रे, संगीता म्हात्रे, सुजाता घरत, नवोदिता घरत, रत्ना घरत, वैशाली भोईर, वैशाली म्हात्रे, ज्योती भोईर, केशर म्हात्रे, नयना म्हात्रे, मंजुळा म्हात्रे, रेवती म्हात्रे आदी उपस्थित होते. फुंडे ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ असून त्यासाठी 25 उमेदवार निवडणूक लढवतील. त्यात फुंडे ग्रामविकास आघाडीचे  लोकप्रिय नऊ उमेदवार निवडणूक लढवतील. फुंडे ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. 1चे उमेदवार गजानन नारायण म्हात्रे (निशाणी-रोड रोलर), भाग्यश्री हार्दिक म्हात्रे (निशाणी-नारळ), प्रविणा गणेश म्हात्रे (निशाणी-कपाट); प्रभाग क्र. 2चे उमेदवार कैलास मधुकर म्हात्रे (निशाणी-रोड रोलर), रिया रामचंद्र म्हात्रे (निशाणी-नारळ), निर्मला दिनेश म्हात्रे (निशाणी-कपाट); प्रभाग क्र. 3 चे उमेदवार जयवंती परशुराम म्हात्रे (निशाणी-नारळ), अतुल अनिल म्हात्रे (निशाणी-कपाट), स्वाती प्रशांत भोईर (निशाणी-रोड रोलर) आदी उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply