पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 54 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल येथे मिरची गल्ली सिध्देश्वर सोसायटी, बाळकृष्ण प्लाझा एमसीसीएच सोसायटी, कळंबोलीत वळवली गाव, कामोठे सेक्टर 35 सिध्दी सृष्टी बिल्डींग, खारघर सेक्टर 12 मंगलमुर्ती रो-हाऊस येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 64 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3294 झाली आहे. कामोठेमध्ये 64 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4625 झाली आहे. खारघरमध्ये 74 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4614 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3830 झाली आहे. पनवेलमध्ये 39 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3537 झाली आहे. तळोजामध्ये तीन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 806 झाली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 20726 रुग्ण झाले आहेत.
उरण तालुक्यात नऊ जणांना संसर्ग; दोन रुग्णांचा मृत्यू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
तालुक्यात बुधवारी कोरोनाचे नऊ नवे रुग्ण आढळले असून, दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांमध्ये म्हातवली स्टार कॉम्प्लेक्स व बोकडविरा प्रत्येकी दोन आणि आयएनएस तुनीर नेव्हल स्टेशन करंजा, खोपटे, बाजारपेठ सेंट मेरी स्कूलजवळ, विंधणे, चिरनेर येथे प्रत्येकी एकाचा आहे. विंधणे व चिरनेर येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1927 व मतृ 99 झाले आहेत. 1698 रुग्ण बरे झाले आहे. 130 रुग्ण उपचार घेत आहेत.
कर्जतमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात बुधवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 1680 झाली असून बरे झालेल्यांची संख्या 1530 व आतापर्यंत 87 जण कोरोनामुळे मृत्युमुखी झाले आहे.आढळलेल्या रुग्णांत कर्जत शहर, दहिवली, पोशिर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात आता कमी रुग्ण आढळू लागल्याने तालुक्यातून कोरोना लवकरच हद्दपार होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
पेणमध्ये 11 नवे पॉझिटिव्ह
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात बुधवारी 11 नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पेण तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या तीन हजार 657 झाली आहे. या रुग्णांपैकी तीन हजार 404 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 96 रुग्ण मयत झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 157 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.