Breaking News

आजपासून भारत-इंग्लंड टी-20चा थरार

अहमदाबाद ः वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर यजमान संघ विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे, तर पाहुणा संघ मागची कसर टी-20मध्ये काढण्याचा प्रयत्न करेल. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाने ट्वेण्टी-20 मालिकेसाठीही जोरदार तयारी केली आहे, पण टी. नटराजनचे या मालिकेत खेळणे अनिश्चित आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला होता, पण तो अजूनही तंदुरूस्त झालेला नाही. त्यातच वरूण चक्रवर्थी राहुल टेवाटिया हे दोघेही तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ट्वेण्टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मुंबई इंडियन्सचा गोलंदाज राहुल चहर याचा संघात समावेश करणार असल्याची शक्यता आहे.

भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या तंदुरुस्त झाला असून, तो मैदान गाजविण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय भारताकडे आता प्रत्येक खेळाडूसाठी एकापेक्षा जास्त पर्याय आहे. त्यामुळे अंतिमत: संघात कुणाकुणाला स्थान मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply