Breaking News

खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप

खोपोली : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी केली. 61जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. चंदनशिवे शहर उपाध्यक्ष दिलीप पवार हे या कार्यक्रमाचे संयोजक होते.  या वेळी कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार तथा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष देवेंद्र साटम, उत्तर रायगड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, शहराध्यक्ष इंद्रमल खंडेलवाल, ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे, शहरसरचिटणीस, ईश्वर शिंपी, महिला आघाडी शहर अध्यक्षा शोभा काटे, युवक अध्यक्ष अजय इंगुळकर, विजय तेंडुलकर मीडिया सेल प्रमुख राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, राकेश दबके, प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावसकर, गीता मोहिते, स्वाती बिवरे, रसिका शेटे, सुनीता महर्षी, स्नेहल सावंत, प्रमोद वाघ, डॉ. परमार, डॉ. सागर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply