Breaking News

चहल म्हणतो, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड आठवला!

बंगळुरू : वृत्तसंस्था

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर सहा धावांनी विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. या सामन्यातील नो बॉल प्रकरण सध्या चर्चेत आहेत, मात्र या बरोबरच या सामन्यात आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले. ते म्हणजे युवराजने फटकावलेले तीन सलग षटकार.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर क्रिकेटप्रेमींना जुन्या युवराज सिंगचे दर्शन घडले. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या युवराजने छोटेखानी खेळीमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. पहिल्यांदा फलंदाजी करीत असताना मुंबईने 187 धावांपर्यंत मजल मारली. या वेळी युवराजने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचत सर्वांची वाहवा मिळवली. युवराजने ब्रॉडला सन 2007मध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहा चेंडूवर सहा षटकार खेचले होते. तो क्षण अजूनही सार्‍यांच्या स्मरणात आहे. याबाबत सामन्यानंतर बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला की, ज्या वेळी माझ्या गोलंदाजीवर युवराजने सलग तीन षटकार खेचले, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड आठवला होता. युवराज हा दिग्गज खेळाडू आहे. तो अनुभवानेही थोर आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीची गोलंदाजी करीत राहिलो आणि तो षटकार खेचत राहिला, पण तीन षटकार खेचल्यानंतर मात्र मी थोडेसे धाडस करून बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर तो बाद झाला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply