Breaking News

पनवेलमध्ये विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू; नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 18मधील आशियाना सोसायटी ते विरुपाक्ष हॉलपर्यंत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विरुपाक्ष हॉल ते आशियाना सोसायटीपर्यंत तीन विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध आले खांब धोकादायक ठरू लागले होते व त्यामुळे तिथे दुर्घटना झाल्या होत्या. या विषयाचा सततचा पाठपुरावा आणि अधिकार्‍यांच्या मागे लागल्याने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आशियाना सोसायटी ते रिलायन्स फ्रेश पर्यंतचे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे कामही मंजूर करून घेण्यात आले आहे आणि लवकरच या कामालाही सुरुवात होणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. या कामाची यशस्वी सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply