Friday , September 29 2023
Breaking News

मुरूडमध्ये पाऊस; पिकाला धोका

मुरूड : प्रतिनिधी        

तालुक्यात बुधवारी (दि. 9) अचानक 15 ते 20 मिनिटे पाऊस पडल्याने कडधान्य व आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानीक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भात पीक घेतल्यानतंर मुरूड तालुक्यातील शेतकरी वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरे अशा कडधान्य पिकांचे तसेच सफेद कांद्याचे उत्पादन घेतात. कडधान्य पिकांना पाऊस चालत नाही, मात्र बुधवारी पाऊस पडल्याने या कडधान्य पिकांना धोका निर्माण झाला आहे.  मुरुड तालुक्यातील सुमारे 1500 हेक्टर जमीनीवर आंबा लागवड केली जाते. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकालासुद्धा धोका निर्माण झाला आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply