नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत आपला देश टोल नाकामुक्त होईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस)ला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन वीक कार्यक्रमात बोलत होते. रशियन सरकारच्या मदतीने आम्ही लवकरच ही जीपीएस सिस्टीम फायनल करू. त्यानंतर दोन वर्षांत भारतातील रस्त्यांवरून टोल नाके नाहीसे होतील, असे त्यांनी सांगितले. सरकारने देशभरात वाहनांची स्वतंत्रपणे वाहतूक व्हावी यासाठी वेगवेगळी पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात केंद्राने देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅग बंधनकारक केला आहे. फास्ट टॅगमुळे इंधनाचा वापर कमी झाला असून, प्रदूषणाचे प्रमाणही घटल्याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …