Breaking News

पेणमधील गणेशमूर्तिकारांना दिलासा

  • कारखाने लवकरच होणार सुरू
  • आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पेण : प्रतिनिधी
पेणमधील गणपती कारखानदारांना दिलासा मिळाला असून, गणेशमूर्ती कारखाने लवकरच होणार सुरू आहेत. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेणमधील मूर्तीकारांचा व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आला होता. बाब स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती तसेच गणपती कारखानदारांना लॉकडाऊनमधून शिथिलता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता शासनाने गणेशमूर्ती साकारण्यासाठी कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
 रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणेशमूर्ती बनविण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. येथील मूर्ती दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यांत तसेच विदेशातही जात असतात.  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशासह राज्यातही 17 मेपर्यंत लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आला आहे, मात्र या लॉकडाऊनमुळे पेणमधील गणेशमूर्ती साकारणार्‍या कारागिरांचीही चिंता वाढली होती. गणेशोत्सव साडेतीन महिन्यांवर आला असताना गणपती कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल मिळणे मुश्किल झाले आहे. मूर्तिकारांच्या समस्या स्थानिक आमदार व माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहारातून निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याची दखल घेत शासनाने मूर्तिकारांना दिलासा देत कारखाना सुरू करण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. कारखान्यात काम करताना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
या विषयाला अनुसरून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गणपती कारखानदारांना काम करण्यासाठी मुभा दिली असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस आमदार रविशेठ पाटील हेही उपस्थित होते. लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याने या कारागिरांनी आमदार पाटील यांचे आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply