नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे शहरात ई-टॉयलेट अथवा मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. यासंदर्भात भाजप नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे कामोठे शहरात सेक्टर 20, सेक्टर 9 आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन लगत ई-टॉयलेट किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रभाग ‘क’ चे वार्ड प्रमुख अरूण कोळी यांनी कामोठे शहरात ई-टॉयलेट बसवून घेतले.
नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते की, कामोठे शहरातील परिसर हा झपाट्याने विकसित होत असून या परिसरातील लोकसंख्याही वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कामोठयात अनेक ठिकाणी गार्डन विकसित झालेले आहेत.
तर तेथे अतिआवश्यक सुविधा म्हणुन तेथील लोकांना शौचालयाची अत्यंत गरज भासत आहे. सेक्टर 9 ऐश्वर्या हॉटेल समोरील मैदाना मध्ये ई-टॉयलेट किंवा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था एकही उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विरंगुळयासाठी जाणार्या लहान मुलांना आणि वृध्द लोकांना शौचालयाची आवश्यकता आहे. सकाळच्या वेळी अनेक नागरीक मॉनिग वॉकसाठी या ठिकाणी येत असतात त्यांना सुद्धा यांचा वापर करता येईल.
त्यामुळे कामोठे शहरातील नागरिकांच्या दृष्टिन सेक्टर 20, सेक्टर 9 आणि खांदेश्वर रेल्वे स्टेशन व गणेश मैदान जवळ असे पुरूष व महिला दोन वेगवेगळे ई-टॉयलेट किंवा मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करावी.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत कामोठ्यात शहरात ई-टॉयलेट अथवा मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले.