Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन

मोहोपाडा : प्रतिनिधी

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी सुरू केलेल्या बॅनक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील व्यक्ती उपस्थित होत्या.

रसायनी पाताळगंगा परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून परिसरातील नागरिक लग्न व इतर समारंभासाठी पनवेल, कर्जत आदी ठिकाणी भाड्याने हॉल घेत आहेत. यासाठी परीसरातील नागरिकांना दिलासा मिळून सवलतीत हॉल मिळावा ही गरज लक्षात घेऊन ज्येष्ठ समाजसेवक के. पी. पाटील यांनी लक्षात घेतली.त्यांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात हॉल उभारले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply