पनवेल : वार्ताहर
तळोजा फेस-2 मधील केदार सोसायटीच्या 13व्या मजल्यावर आगीची घटना घडली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले.
तळोजा फेज-2 मधील सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुलातील एल – 8 इमारतीच्या 13व्या मजल्यावर भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अजय बिलोड यांच्या घरात आग लागली. या वेळी काही नागरिकांना इमारतीतून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी 13 व्या मजल्यावर आग विझविण्यासाठी धाव घेतली, मात्र घरातील बिलोड कुटुंबिय बाहेर गेल्यामुळे दरवाजा बंद होता. त्यामुळे नागरिकांना काहीच करता येत नव्हते.
या वेळी काहींनी खारघर आणि कळंबोली येथील अग्निशमन केंद्रात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तर आगीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच रहिवाशांनी इमारती मधील अग्निशमन यंत्रणा सुरु करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. अखेरीस रहिवाशांनी दुर्घटनाग्रस्त घराचा दरवाजा तोडून बादलीने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दाखल झालेल्या खारघर आणि कळंबोली येथील अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत बिलोड यांच्या घरातील बेड, टीव्ही, फ्रीज, कपडे इत्यादी साहित्य जाळून खाक झाले
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …