पाली : प्रतिनिधी
शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ कोकण झोन क्रीडा विभागातील स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत 1500 मी व 5000 मी महिला गट ऋतुजा सकपाळ सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट लक्ष्मण दरवडा सुवर्ण पदक, 1500 मी. पुरुष गट करण माळी कांस्य पदक, 10,000 मी. पुरुष गट चिंतामण शिंगवा कांस्य पदक, स्वराज घरट बॉक्सिंग 48 ते 51 कि. वयोगट कांस्य पदक पटकाविले, तसेच 10 किमी. क्रॉस कंट्री स्पर्धेत ऋतुजा सकपाळ हिला मुंबई विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस व्ही पाथरकर, क्रीडा प्रशिक्षक प्रा. संतोष भोईर, क्रीडा व्यवस्थापक संजय काटकर, क्रीडा सदस्य प्रा. सरिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन केले आहे. या यशानंतर सुएसोचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्याध्यक्ष गीताताई पालरेचा, मुंबई विद्यापीठ कुलसचिव सुधीर पुराणिक, सचिव रवी घोसाळकर, महाविद्यालय प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपंचांग, उपप्राचार्य एम. एस. लिमन, सर्व प्राध्यापक तसेच इतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …