Breaking News

देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी

राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे. असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन पॉपस्टार रिहानाने केलेल्या ट्विटनंतर नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकरने ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केल्याचे समोर आल्याने, सचिनबद्दल विविध प्रतिक्रिया समोर आहेत. केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून त्याचा निषेध नोंदवला. यामुळे आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.

आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणार्‍या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया असे ट्विट तेंडुलकरने म्हटले होते.

युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध

एकदा केरळ येथील युवक काँग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणार्‍या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो! अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply