Breaking News

कळंबोलीत वृक्षांवर वारंवार विषप्रयोग

पनवेल : वार्ताहर

कळंबोली वसाहतीत पनवेल ते सायन महामार्गालगत जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने चक्क झाडांवर विषप्रयोग केला जात आहे. एका पाठीमागून एक वृक्ष संपवण्याचे कारस्थान सुरूच आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. शेवटी आमच्यासाठी नव्हे किमान तुमच्यासाठी तरी आम्हाला वाचवा अशा प्रकारे झाडांचा अर्त टाहु कळंबोली विकास समिती अनोख्या पद्धतीने प्रशासन आणि नागरिकांसमोर मांडणार आहे.

पनवेल सायन महामार्गालगत वर्षभरापूर्वी एका खाजगी जाहिरात कंपनीने मोठे होर्डिंग उभे केले. जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला. अचानक हिरवीगार असलेली झाडे सुकुन गेले धोकादायक वृक्षांवर कुर्हाड मारण्यात आली. आणि या ठिकाणची वनसंपदा नाहीशी झाली. यासंदर्भात कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आवाज उठवला.  काही दिवसांपूर्वी मॅकडोनाल्ड समोरील काही झाडे रात्रीतून तोडण्यात आली याबाबतही कळंबोली विकास समितीने संबंधितांकडे तक्रार केली. हे प्रकरण ताजे असताना एका मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला बिळे पाडून त्यामध्ये घातक रसायन टाकण्यात आले. परिणामी हे झाड वाळले. यासंदर्भात प्रशांत रणवरे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिकेला लेखी तक्रार केली होती.

अशाप्रकारे झाडांवर राजरोसपणे विषप्रयोग करून ते नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कट आखला जात आहे. दोन दिवसांपूर्वी आणखी एका झाडाच्या खोडांना इजा पोचून त्याठिकाणी रसायन भरले आहे. येथे नवीन एक जाहिरातीचे होर्डिंग्ज उभारण्यात येणार असल्याने अशाप्रकारे विषप्रयोग केला गेला असल्याचे बोलले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कळंबोली विकास समितीच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply