आमदार महेश बालदी यांचे आवाहन
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये आलेले यश पाहून आपल्या कार्यकर्त्यांनी व बूथ अध्यक्षांनी कामाला जोमाने लागावे उरण तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतीवर आपल्यांना यश येईलच.झालेल्या निवडणुकीत आपण काय केले व आपल्यांना पुढील काळात काय करायला पाहिजे त्याबद्दल माहिती घ्यावी. माझी मत कशी वाढतील याकडे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे येणार्या निवडणुकीबाबत विचार विनिमय केले पाहिजे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले.
भाजप बूथ संपर्क अभियाना संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. उरण तालुक्यात बूथ कमिटी संपर्क अभियान कार्यक्रम राबविण्याकरिता शुक्रवारी (दि. 5) द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप रायगड जिल्हा संघटक अविनाश कोळी या वेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, चार ते पाच बूथ मिळुन एक शक्ती केंद्र प्रमुख बनवा. एक बूथमध्ये 30 कार्यकर्त्यांची यादी बनवा. पाच बूथची जबाबदारी शक्ती केंद्र प्रमुखाची राहील. महिन्यातून एक बैठक घ्यावी. बूथ अध्यक्षांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना माहिती द्यावी.
ही बैठक उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस नंदु पटवर्धन, तसेच भाजप जिल्हा संघटक अविनाश कोळी यांच्या उपस्थित झाली. या वेळी पदाधिकार्यांच्या विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना आमदार महेश बालदी व जिल्हा संघटक अविनाश कोळी यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
या वेळी उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, ओबीसी सेल रायगड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, शहर अध्यक्ष कौशिक शाह, रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, तालुका युवक अध्यक्ष शेखर पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप ठाकूर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमंत भोईर, तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत, प्रकाश ठाकूर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दिपक भोईर, तालुका चिटणीस कुलदीप नाईक, नगरसेविका रजनी कोळी, जानव्ही पंडीत, यास्मिन गॅस, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदु लांबे, मेराज शेख, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, तालुका महिला सरचिटणीस निर्मला घरत, तालुका महिला माजी अध्यक्षा संगिता पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालुका ओबीसी सेल चिटणीस प्रमोद म्हात्रे, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश तांडेल, शेखर तांडेल, तालुका चिटणीस नरेश म्हात्रे, अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, ज्येष्ठ कार्यकर्ते मदन कोळी, हितेश शाह, मनोहर साहतिया, अजित भिंडे, कुणाल पाटील, देविदास पाटील, नमोद ठाकूर, संदेश पाटील, रवी म्हात्रे, बाळा गावंड आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.