Breaking News

…तेथे विजय घडेल!

जिथे पाऊल पडेल, तेथे विजय घडेल! असे कोणाबाबत म्हणता येईल? संभ्रम पडला ना, पण याचे उत्तर मिळेल ते पनवेलकरांकडूनच! हो, पनवेलकर छाती ठोकपणे सांगतील की लोकनेते रामशेठ ठाकूर. वास्तवही तेच आहे आणि सत्यही तेवढेच आहे. राम म्हणजे रायगडचा मसिहा! शेठ म्हणजे शेवटपर्यंत ठसणारा! चांगू म्हणजे चांगल्या गुणांचा! ठाकूर म्हणजे ठासून कुणाचेही रक्षण करणारा! अशा या माणसातल्या देवाला सत्तराव्या जन्मदिनी मंंगलमय शुभकामना…

समोरच्या कोणाही व्यक्तीबरोबर अदबीने बोलत आपल्या स्मितहास्याने त्या व्यक्तीचे मन जिंकून घेणे. ती व्यक्ती निराश वा नाराज न होता आपल्या पदरात काहीतरी पडेल या आत्मविश्वासाने आनंदाने बंगल्याबाहेर पडेल याची काळजी घेत सकारात्मक संवादाने त्या व्यक्तीशी आपुलकीने वागणे ही किमया या देवमाणसातच आहे! बंगल्यातून पनवेलकर पिल्लांकडे घारीच्या नजरेने पहाणारा स्व. भागूबाईमातेचा सुत, जनहिताचा आलेख चढता ठेवण्यात गर्क असलेला राम. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार आपुलकीने, वचनबद्धतेनुसार त्यांच्या घरच्या समारंभास आवर्जून उपस्थित रहाण्याचा चांगला गुण असणारा राम. संकटकाळात ठामपणे कुणाचेही रक्षण करण्याची धमक असलेला राम. शैक्षणिक क्षैत्रातील गरुडझेपेने पनवेलचा लौकिक वाढविणारा राम. सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सामाजिक सेवेला उत्तुंग शिखरापर्यंत चढवित जनतेसाठी अहोरात्र झिजणारा राम असा त्यांचा लौकिक आहे.

रायगडच्या राजकारणात दबदबा ठेवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर दोनदा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. 2004नंतर शेकापला राम राम ठोकून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्या पक्षाला उभारी आणली. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे रामशेठ ठाकूर समर्थक होते. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुत्र प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने शेकापची मजबूत तटबंदी मोडीस काढत 50 वर्षांनंतर काँग्रेसचा आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. खारघर टोलनाक्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आडमुठेपणामुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली. जनसेवा व जनकल्याणार्थ त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेथेही प्रशांत ठाकूर सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून आले.

आजपर्यंत बुद्धविहार असो, समाजमंदिर असो, मंदिर-मस्जिद असो, जयंती असो, मैदानी खेळांचे सामने असो वा सांस्कृतिक स्पर्धा असो. अशावेळी सढळ हस्ते देणग्या देऊन तसेच गरजूंना पुरेशी मदत करून दानी देवमाणूस म्हणजे रामशेठ ठाकूरच!

जाता जाता एक मनातलं सांगावेसे वाटते की, सद्यस्थितीत कोरोनाच्या महामारीने जनता हैराण आहे. अशा आपातकालप्रसंगी लोकांच्या मागे उभे राहाणे अत्यावश्यक आहे. लोक लढायला तयार आहेत, पण ते कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार? सद्यस्थितीत सर्वच समाजाची नेतेमंडळी कमकुवत झालेली आहेत. त्यामुळे जनताही हतबल झालेली आहे. म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खंबीर नेतृत्व गरजेचे आहे. कारण त्यांच्यामध्ये सर्वतोपरी ते गुण, अष्टपैलूत्व भरभरून आहे.

सितारों से ऊँचा हो रुतबा तुम्हारा.. बनो तुम हर एक जिंदगी का सहारा..

तुम्हें जिससे उल्फ़त हो मिल जाए तुमको.. समझ लो हमारी दुआ का इशारा..

मुकद्दर तुम्हारा सदा जगमगाए.. तुमको हमारी उमर उमर लग जाए…..

-श्याम साळवी, नवीन पनवेल

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply