Breaking News

तळवळी आठवडी बाजाराला कुणाचे अभय?

तळवळी आठवडी बाजाराला कुणाचे अभय?

नवी मुंबई : प्रतिनिधी

दर गुरुवारी तळवळी येथे भरणार्‍या अनधिकृत आठवडी बाजाराला विविध घटकांचा विरोध असतानाही त्यावर घणसोली अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे काही घटकांनी प्रभाग समितीत आवाज उठवून, तर काहींनी पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. तळवळी येथील गावदेवी मंदिरालगत असणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आठवडी बाजार भरत आहे. आठवडी बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न  निर्माण होतोच, परंतु खिसेकापूदेखील गर्दीचा फायदा घेऊन महिलांना लुटत आहेत, तसेच गर्दीचा फायदा घेऊन महिलांना त्रास देत असल्याचे वास्तव आहे. याकडे घणसोली विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे डोळेझाक करीत असल्याचा नागरिकांकडून आरोप होत आहे.

 हा बाजार बंद व्हावा म्हणून स्व. नगरसेवक निवृत्ती जगताप यांनी वेळोवेळी प्रभाग समितीमध्ये आवाज उठवला. त्यावेळी उपस्थित असणार्‍या अधिकार्‍यांनी पळवाट शोधून उत्तरे दिली, परंतु त्यावर आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही, तसेच तळवळी गावकीचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनीदेखील अनेकदा पत्रव्यवहार केला, परंतु त्यांनाही अपयश आले. 

  • आम्ही वेळोवेळी या आठवडी बाजाराविरोधात पत्रव्यवहार केला आहे. अधिकार्‍यांची

भेटही घेतली. तरीही अनधिकृत बाजारावर कारवाई होत नाही. यामागे नक्कीच अर्थकारण असल्याशिवाय असे होऊ शकत नाही.

-स्वप्नील पाटील,

अध्यक्ष, गावकी तळवळी.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply