Breaking News

खारघरमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघरमधील कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड उपचार रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघरमध्ये कोविड उपचारासाठी रुग्णालयांची वाढ करण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना यासंबंधीच्या कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे.  
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. त्यापासून बचावासाठी राज्य सरकारने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन जारी केला आहे. आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील परिस्थितीही काही वेगळी नाही. याच क्षेत्रातील खारघर विभागात एप्रिलपासून दररोज सरासरी 160च्या वर कोविड रुग्णांची भर पडत आहे. आजच्या तारखेला 1500च्या जवळपास अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत.
यातील अनेकांना व्हेंटिलेटर, आयसीयू व ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासते. आजमितीस खारघरमध्ये फक्त पाच हॉस्पिटल्सना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी मिळाली आहे. भविष्यातील धोक्याचा विचार करता आणखी पाच हॉस्पिटल्सना परवानगी दिली, तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची सर्वांना व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply