Breaking News

सानपाडा येथे 87 निरंकारी भक्तांकडून रक्तदान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, सानपाडा येथे रविवारी (दि. 7) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 87 निरंकारी भक्तांनी

उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्याचबरोबर 52 युवकांची याच ठिकाणी मायनर थैलेसिमिया तपासणी करण्यात आली. संत निरंकारी रक्तपेढीचे डॉक्टर व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या चमूने रक्तपेढीचे प्रभारी मारुती कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.  थदाराम तोलाणी यांच्या तोलाणी सेवा संकल्प, ठाणे या संस्थेच्या वतीने सुनील हरचंदानी यांनी थैलेसिमिया तपासणीचे कार्य केले. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे मुंबई झोनचे क्षेत्रीय प्रभारी भूपेंद्रसिंह चुघ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या वाशी शाखेचे मुखी अनिल शिंदे, निरंकारी सेवादलाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर आदी उपस्थित होते. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक मनोहर सावंत, पी. एम. नाईक आणि स्थानिक सेवादल युनिटचे संचालक संतोष मांढरे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply