Breaking News

ठाकरे सरकारची मदत तुटपुंजी

पनवेलमधील रिक्षावाल्यांनी व्यक्त केली खंत

भाड्याने रिक्षा चालविणार्‍यांचीही मदतीची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात सुमारे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलमध्ये परवानाधारक असलेले रिक्षाचालक सुमारे 25 हजार रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांनी मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याची खंत व्यक्त केली आहे, तर भाड्याने रिक्षा चालविणार्‍या चालकांनी या मदतीचा लाभ आम्हालाही द्यावा, अशी मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. त्याचबरोबर मृत्यू संख्यादेखील वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. ती 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळात एक चालक व दोन प्रवासी अशा अटीप्रमाणे रिक्षाला परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून फक्त परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे, परंतु भाड्याने रिक्षा चालवणार्‍यांची संख्याही मोठी आहे. ज्यांची रिक्षा नाही, परंतु रिक्षा चालवितात त्यांचे काय, असा प्रश्न पनवेल परिसरातील काही रिक्षाचालकांनी प्रस्तुत प्रतिनीधीला माहिती देताना उपस्थित केला.

दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा सरकारने लॉकडाऊनच्या काळात पाच हजार रुपयांची मदत देऊ केली. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पाच हजारांची मदत द्यायाला हवी होती. अशी अपेक्षाही काही रिक्षाचालकांनी व्यक्त केली. रिक्षा चालविण्याचा परवाना आहे. बॅच आहे, परंतु रिक्षा नाही. अशा चालकांनाही दीड हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी पनवेल परिसरातील रिक्षाचालकांची आहे.

परवाना धारक अनेक रिक्षा चालक भाड्याने रिक्षा देतात. अशा रिक्षा चालकांनाही या योजनेत मदत द्यायाला हवी, जाहीर झालेल्या मदत कमी आहे. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर पाच हजार रुपये मदत देयाला पाहिजे होती. अनेकांनी कर्जावर रिक्षा घेतली आहेत. त्यांचे हप्ते फेडणे मुश्किल झाले आहे. -गणेश भापकरे, रिक्षा चालक

शासनाने परवाना रिक्षा चालकांना मदत जाहीर केली आहे. संचारबंदीमुळे रिक्षा चालकांना धंदा नाही. त्यामुळे कौटुंबिक गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने दिलेली मदत लवकरात लवकर रिक्षा चालकांना मिळावी. -नरेश परदेशी, अध्यक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक संघटना

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply