Breaking News

नवी मुंबईत बोगस कोरोना अहवाल बनविणारे अटकेत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेत येणार्‍या कंपन्यांमधील कामगारांना कोरोना टेस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार रबाले एमआयडी मधील कंपन्यांनी केलेल्या कोरोना टेस्टिंगचे बोगस रिपोर्ट तयार करणार्‍या तीन जणांना पोलिसांनी अटक केले आहे. कोरोना रिपोर्टमधील क्यूआर कोड स्मार्ट फोनने स्कॅन करून पडताळणी करा, असा सल्ला तज्ञांनी दिला.

रबाले एमआयडीसीमध्ये असलेल्या परविन इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या 133 कामगारांची कोरोना टेस्ट केली होती.133 कामगारांच्या आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी मिडटाऊन लॅब ठाणे, परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी कल्याण यांना बोलवण्यात आले होते. या दोन्ही लॅबने आपले थायरोकेअर लॅबबरोबर टायअप असल्याचे परविन कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. आरटी-पीसीआर टेस्ट केल्यानंतर मिडटाऊन लॅब आणि परफेक्ट लॅबने सर्व कामगार निगेटीव्ह असल्याचे रिपोर्ट परवीन कंपनीला दिले होते. 133 कामगारांचे सर्वच निगेटीव्ह कसे, हा संशय आल्यानंतर क्यूआर कोड तपासला असता थायरोकेअर लॅबचे बोगस लेटरहॅड तयार करून खोटे रिपोर्ट दिल्याचे परवीन इंडस्ट्रीज कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

सध्या कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरल्याने सरकारी लॅबवर प्रचंड ताण आला आहे. यामुळे अनेक जणांनी खाजगी लॅबकडून आपल्या आरटी-पीसीआर कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत, मात्र मिळालेले रिपोर्ट खरे की खोटे असा संशय निर्माण होवू लागला आहे. हा संशय दूर करण्यासाठी कोरोना रिपोर्ट वर असलेला क्यूआर कोड स्मार्ट मोबाइलने स्कॅन करण्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय. स्कॅन करताच खरी माहिती समोर येत असल्याने बोगस रिपोर्टचा भांडाभोड करण्यास मदत होणार आहे. बोगस कोरोना रिपोर्ट तयार करून आरोग्य यंत्रणेशी खेळणार्‍या मिडटाऊन लॅब, परफेक्ट लॅबच्या तीन मालकांना रबाले एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी अनेक कंपन्यांच्या कामगारांची आरटी-पीसीआर टेस्ट करून 300च्या वर कोरोनाचे बोगस रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply