Breaking News

बेलापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप

नवी मुंबई : बातमीदार
भाजप उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करताना उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामध्ये बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. राजेश राय यांनी शाश्वत हिंदूच्या कोकण प्रांत संघटनेचे मंत्री असल्याने सर्व लोकांना त्यांचे वाढदिवस, विवाह, सामाजिक कार्ये मंदिराच्या आवारातून करण्याचे आवाहन केले.
दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते गरिबांसाठी सामाजिक कार्य करत असतात, या वेळी महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे कार्ड वाटप केले. या कार्ड अंतर्गत गरीबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाश्वत हिंदू राष्ट्रीय समन्वयक संजय शर्मा यांनी राजेश राय यांचे या उदात्त कार्याबद्दल अभिनंदन केले तर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी योजनांवर काम करणार्‍या सुषमा सिंह यांचे कौतुक केले. तसेच संपुर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. या वेळी विशेष अतिथी म्हणून भाजपा आयटी सेलचे प्रदेश संयोजक सतीश निकम, जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील, माजी नगरसेवक जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे व बेलापूर मंडल अध्यक्ष दर्शन भारद्वाज, उत्तर प्रदेश सेल संयोजक मार्कंडेय केवट व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आयटी सेलचे राज्य संयोजक सतीश निकम यांनी राजेश राय यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply