‘आरसीबी’च्या विजयाची हॅट्ट्रिक
चेन्नई ः आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सला पराभूत करीत स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदविला. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या झंझावाती अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यांनी सरतेशेवटी 8 बाद 166 धावांपर्यंत मजल मारली. या विजयासह आरसीबी संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे.