पनवेल ः वार्ताहर
संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे कलाकार आणि लोककलावंत यांचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी कलाकार आणि लोककलावंत गेली 17 महिने घरी बसून आहेत. तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काही मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला देण्यात आले. मोर्चाचे निमंत्रक लावणी महासंघ, मुंबई होते. तसेच या वेळी संगीत एकता रायगड संस्थेचे कलाकार मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.