Breaking News

आता पावसाळ्यातही रो-रोची सफर

मांडवा-भाऊचा धक्का फेरीबोट सेवेस बंदर विभागाची परवानगी

अलिबाग ः प्रतिनिधी

सर्व हंगामामध्ये सक्षमपणे प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची  रो-रोसेवा पावसाळ्यातदेखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मांडवा-भाऊचा धक्का रो-रो फेरीबोटसेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. यातून भर पावसाळ्यात अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांना सागरी प्रवासाचा आनंद लुटता  येणार आहे.

मागील वर्षी 15 मार्च रोजी मांडवा ते भाऊचा धक्का या रो-रोसेवेचे उद्घाटन झाले होते, मात्र अवघ्या चारच दिवसांत कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागल्याने ही सेवा बंद होती. पुन्हा 20 ऑगस्ट रोजी रो-रो सुरू झाली होती, परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर काही फेर्‍या कमी कराव्या लागल्या होत्या.

आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुंबई आणि रायगड जिल्हा सावरत असल्याने पर्यटन व्यावसायिक पावसाळी पर्यटनाच्या अनेक कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांच्यासाठी रो-रो सेवा लाभदायक ठरणार आहे.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply