अलिबाग ः प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रायगड जिल्ह्यासाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली.
कोरोनाचा दुसर्या लाटेतील कहर थांबता थांबत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याला 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष या नात्याने मी कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याकरिता 12 लाख रुपये निधी आपल्या आमदार फंडातून निरंजन डावखरे यांनी मंजूर केला आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे, असे अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले.