टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर शुक्रवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कोंबड्या वाहून नेणार्या टेम्पोची पुढील ट्रकला धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक नयूम दुस्तीगीर शेख (वय 41. रा उस्मानाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचे मोठे नुकसान
झाले आहे.
दरम्यान, याच सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी दोन कंटेनर उलटल्याने मुंबई लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यंत्रणांनी तातडीने उलटलेले कंटेनर बाजूला केल्यानंतर सुमारे एक तासाने द्रुतगती मार्गावरील वाहतूक अखेर सुरळीत झाली.