केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नागरिकांना आवाहन
नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील कोरोनाबाबतचीआव्हाने अद्याप संपलेली नाहीत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालय म्हटले आहे. तसेच, सरकारने दावा केला आहे की, तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 5 लाख ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील कोरोनाबाबतचे आव्हान अद्याप संपलेले नाही. काही प्रमाणात, आम्ही म्हणतो की आपण कोरोनाच्या दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आपल्याला कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. 5 राज्ये (केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक) जिथे 10,000 पेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत.
देशातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट मागील आठवड्यात 1.68% होता, तर यापूर्वी हा 5.86% होता, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही जिल्ह्यांसह 28 जिल्हे आहेत, ज्यात पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% दरम्यान आहे, म्हणजे उच्च संसर्ग दर. तर 34 जिल्हे असे आहेत, जिथे आठवड्याचा पॉझिवटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त आहे.
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या तयारीविषयी सांगितले की, राज्यांमध्ये 8.36 लाख हॉस्पिटल बेड तयार करण्यात आले आहेत. 9.69 लाख आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. देशभरात 4.86 लाख ऑक्सिजन बेड आहेत. त्याचप्रमाणे 1.35 लाख आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. डॉ व्ही के पॉल म्हणाले की, सरकार दररोज 4.5 ते 5 लाखांपर्यंतच्या प्रकरणांची तयारी करत आहे. पहिला डोस 71% लसीकरणापर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्या प्रकारची प्रकरणे वाढतील, याची गणना करण्यासाठी आपल्याकडे कोणताही सरळ फॉर्म्युला नाही आहे.
आरोग्य सचिव म्हणाले की, आतापर्यंत देशात कोरोनाची 3.39 कोटी प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर सध्या देशभरात 2.44 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु केरळमध्ये अजूनही जास्त कोरोना रुग्ण असल्याचे समोर येत आहे. कोरोना प्रकरणांमध्ये, केरळमध्ये सर्वाधिक 50% पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद होत आहे, तर महाराष्ट्र 15.06%, तामिळनाडू 6.81% आणि मिझोरम 6.58% प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मते, 5% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या राज्यांमध्ये मिझोरम आघाडीवर आहे. मिझोरममध्ये 21.64% आणि केरळमध्ये 13.72% पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर सिक्कीम, मणिपूर आणि मेघालयचा नंबर लागतो.
आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव म्हणाले की, आतापर्यंत भारतात 92.77 कोटी डोस देण्यात आले आहेत. पहिल्या डोस कव्हरेजची राष्ट्रीय सरासरी आता 71 टक्के आहे. लक्षद्वीप, चंदीगड, गोवा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये सर्वांना पहिला डोस देण्यात आला. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सणासुदीच्या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा देताना सांगितले की, भारत सरकार म्हणते की ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर हे सणांचे महिने आहेत आणि या काळात लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सणासुदीच्या काळात लोकांनी सावध राहावे, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे. मास्क घालणे खूप महत्वाचे आहे. लसीकरण हे एका ढालीसारखे आहे.